जेव्हा जेव्हा राष्ट्रधर्मास ग्लानी येते
वीरपुरुषा, तेव्हा तेव्हा तू जन्म घेतलास!
विक्रमापासून शिवाजीपर्यंतची
सारी चरित्रे तुझी साक्ष देतात ॥
हे वीरपुरुषा,
तुझ्या नव्या अवताराचा उषःकाल होत आहेसे वाटते !
प्रार्थना एकच करतो की
व्यक्ती म्हणून पुन्हा जन्म घेऊ नकोस;
व्यक्ती-व्यक्तींमधून व्यक्त हो!
कारण,
व्यक्तीपूजेनंच आमची वीरता
आज विदीर्ण केलीय,
मनं संकुचित केलीयत ॥
ऱ्यशवंत जोशी