फुलून आल्यावर माळरांन

सुकलेल गवत

भिरभिरतं हवेवर,

पडलेली पानं

शोधतात हरवलेल्या वाटा.

पाय नाही टेकवत

तापलेल्या माळरांनावऱ,

उन्हापासून आडोसा

तऱ मीच एक सावली.

पण माळरानाला एक दिवस,

अचानक जाग येते,

पाचोळा अलगद झटकून

ते हळुवार श्वास घेते.

झाडांवर वेलींचा

ताफा घुमू लागतो,

खडकातून फुटलेला

रानचाफा खुलू लागतो.

फुलून आल्यावर माळरांन

उन्हालाही गंध चधतो,

माझी सावली गळून पडते,

मीही केवळ फूल उरतो.