पौर्णिमा

पूर्ण चंद्र

शीतल चांदणं

सार्द्र मन

अमृत तृप्ती

हिरवी धरती

तरल टवटवी

पुन्हा मंडलगती

सुधा-तम सुधा-तम

अव्याहत !

नकोच मातीची सांवली

चल मिळवू ब्रह्मप्रकाश

त्रिपुर तृप्ती

चिरंतन !!