तडफडून हृदयाचे सारे बुरूज झरले
आज तिचे रुसणे शेवटचे रुसणे ठरले
चिन्ह दिसेना पडझडीत सुटका होण्याचे
सावरले कवितेने मजला, तर सावरले
तक्रारी आता साऱ्यांच्या वाढत गेल्या
असणे माझे असण्याला माझ्या घाबरले
निरोप घेता ती ना रडली, ना रडलो मी
नेत तिला, एकाकीसे रस्ते थरथरले
त्या काळाची तीव्र वेदना तशीच आहे
झाकपाक करताना सारे जीवन सरले