आता तुझ्याकडे...
कांहीच मागणे नाही ॥धृ॥
आशा मनी धरोनी
मागितले मी जेव्हा
घेवूनी बाळसे चंद्र
रातभर हांसत होता
पाहता पाहता वाट
चंद्र रोडावत गेला !
विझल्या मनास आता
बहर कां येणार आहे?
आता तुझ्याकडे... कांहीच मागणे नाही ॥१॥
आशा मनी धरोनी
मागितले मी जेव्हां
धुंदीत तूं तुझ्या
धुतकारिलेस मजला
शब्दही महाग तेव्हां
गेलास झणी निघोनी !
वाळल्या तुळशीवरी कां
मंजिरी फुलणार आहे ?
आतां तुझ्याकडे...
कांहीच मागणे नाही ॥२॥
आता तुझ्याकडे...कांहीच मागणे नाही !!