आई समीप येता
पुत्रांस शोक झाला ।
न जाणता तुला गे
किती काळ व्यर्थ गेला ॥
पुत्रांस आई वाटे
देवापुढील ज्ञान ।
आईस पुत्र वाटे
हृदयामधील प्राण ॥
जगतात राम नाही
आईशिवाय काही ।
त्याचेच देवपण तो
आईमुळेच पाही ॥
आईपुढेच नम्र
आईपुढे कृतज्ञ ।
नमतो इथेच तोही
सर्वांहुनी सर्वज्ञ ॥