वाटा वाटा वाटा
चहुऔर भिरभिरणार्या वाटा
कहि जवळ येणार्या
तर कहि दूर नेणार्या वाटा
वाटा वाटा वाटा.....
कहि मागे सोडणार्या वाटा
तर काहि,
नविन मिळऊन देणार्या वाटा
वाटा वाटा वाटा.....
सासुरवाशिणला महेरचा
निरोप घेउन येणार्या
आणि त्या निरोपामागुन
मम मातिचा गंध देणार्या वाटा
वाटा वाटा वाटा.....
प्रियतमेच्या घरकडे
धावुन जाणार्या वाटा
कधी निराश तर कधि
आनंदचा अर्थ देणार्या वाटा
वाटा वाटा वाटा.....
काही तिच्यासोबत
फ़िरतांनाच्या भिजरया वाटा
तर कधि विरहात, अश्रुत
भिजलेल्या त्याच वाटा
वाटा वाटा वाटा.....
कहि धावणार्या
तर काहि शांत वाट
कहि सतत मनुष्याच्या
अविष्काराने चिरडणार्या
तर कहि एका स्पर्शासाठी
हुरहुरणार्या वाटा
वाटा वाटा वाटा.....