आयुष्यात अशीच माणस हतबल असतात;
जि अस्तित्वापासून खूप लांब असतात,
शिक्षा अश्यानाच होते;
जे कधिही दोषी नसतात.
प्रत्येकजण जगत असतो;
ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रांत;
आजच्या चांगल्या वागण्याची शिक्षा कधी;
याची सगळ्यानाच असते भ्रांत.
अस म्हणतात दैव आपल्याला;
तुम्ही जे दिलं तेच परत देतं;
पण तुमच्या अस्मितेची किमत घेऊन;
डोंगरा एवढं आयुष्य देऊन जातं.
पुन्हा होतो तोच प्रवास सुरू;
चांगल करून सुद्धा शिक्षा भोगण्याचा;
रोज रोज मरूनसुद्धा;
हसत हसत जगण्याचा