लग्न लग्न म्हणजे काय असतं,
पहाटे पडलेलं साखर स्वप्न असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं,
लव आणि अरेंजवाल्यांचं सेमच असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं,
गावभर उंडारून सुचलेलं शहाणपण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं,
सारा नवशिक्यांचा खेळ , अनुभवाचं नाव नसतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं,
आपल्या माणसासाठी नकळत बदलणं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं,
आपल्या माणसाचं आवडतं काँबिनेशन असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं,
खोटं खोटं रागावणं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं,
खरं खरं समर्पण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं,
आधी नाहीतर नंतर प्रेमात पडणं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं,
जे मिसमॅच असतं तेच पर्फेक्ट मॅच असतं.
.