शय्येवरचं महाभारत

आजकाल

माझी झोप...

गांधारी

डोळ्याची झापडं

बळेच मिटवलेली

जाणीव...

तारवटलेली

असहाय्य

स्वप्ने...

कौरव

स्वच्छंद

अविवेकी

गात्रे...

पांडव

वैकल्यग्रस्त

हताधिकारी

शेवटी...

धावा कृष्णाचा

वैकुंठलाभ

अल्पकाळ

शय्येवरचं महाभारत...

असं हे

रोजचंच ॥