मातृऋण

सायंकाळी... कट्ट्यावरती

नियमित जाणे... वाट पाहणे

तिची ।

ती...

गोडगोबरी... ताजीतवानी...

चंचलनयनी... किंचित हंसरी...

आठवणीतील।

दिसता ती... कोपऱ्यावरी...

नजर माझी... तिच्यावरी...

अनिमिष ।

मानेचं वळणं... तिच्या गतीनं...

नजरेच्या टप्प्यातनं

तिचं दूर जाणं...

माझा सुस्कारा ।

एके दिवशी

अमनधपक्या..

मागून कुणाचं तरी येणं...

गळपट्टी पकडणं..

हासडणं... दरडावणं...

लाकडं पुढं पाठविलीत !

जाब विचारणं...

माझा श्वास...

अवरुद्ध ।

नजरेत स्पष्टीकरण...

माझी मुलगी... गेलेली...

अशीच ।

त्याचं वरमणं ।

दुसऱ्या दिवसापासून...

तिचं जाता जाता

क्षणभर थांबणं...

काका कसे आहात, विचारणं...

हंसणं, नजरेनं निरोप घेणं...

कधी मी गोळी दिलीच तर

लगेच वेष्टण सोडून मटकावणं...

गोडसं हंसून थ्यांक्स म्हणणं।

मला आता

मातेचं ऋण फेडल्याचं समाधान ॥