सोनपरी..

सोनपरी..

=============
.
.
गोड गोजिरी,
रूप साजरी,
प्रसन्न वदनी,
राज नंदिनी...!
.
शांत शांतशी,
अथांग हृदयी,
प्रीत लोचनी,
निरंतर बोली...!
.
कळीच फुलली
जणू अंगणी..!!
पाकळी पाकळी
डौल ठासली..!!
.
सळसळ वनी..
काट्यांच्या मनी
खोटी की खरी..?
जरी सोनपरी..!!!
.
खुलली फुलली..
रसरसून झुकली..!
लपून का राही
सुगंध कधी..?
.
रंगा भुलती
जन सभोवती..
उत्सव मानती
ढंगा पाहूनी..!
.
झुळूक हवेची
तोच घे गिरकी...
नि सळसळ बोलकी
उन्मळे अवघी...!
.
भिजल्या रानी
दरवळे तत्क्षणी..
हसुनी हसवी
तिच खरी.
.
सोनपरी.. ती,
सोन परी...!!!
.
.
=============
स्वाती फडणीस
२७-०५-२००९