देणे

घेण्याचे काम आपुले
आयुष्यभर घेतच आलो
        जीवनात या आलो आम्ही
        मुळातच उसना घेऊनी जन्म
        जीव हि अमुचा नाही मुळी
        तो ही ऊसानं घेऊन आलो
घेण्याचे काम आपुले


आयुष्यभर घेतच आलो

        नामकरणाच्या मंगल वेळी
        उसन्याची पुन्हा आली पाळी
        नवीन नवीन सगळे म्हणता
       मागच्याचेच तेही घेऊन आलो
घेण्याचे काम आपुले


आयुष्यभर घेतच आलो
       गडगनज कमावून पैसा
       स्वतःचे काही म्हणुनी
       माजा माजा होता कुठे
      खिच्यातून दुसऱ्यांच्या घेऊन आलो
घेण्याचे काम आपुले


आयुष्यभर घेतच आलो
       जन्म ना आपल्या हाती
       मरण तरी आपुले बरे
      सरणा वरती चढलो आम्ही
      वासना उसन्या घेउन आलो
घेण्याचे काम आपुले


आयुष्यभर घेतच आलो