आज अचानक भेटली ती मला;
एखाद्या आगंतुकासारखि;
आणि म्हनाली माझ्याविना;
तु राहतोस कसा जिवनि.
या प्रश्नाने क्षणभर मला;
विचारात पडाया लावले;
आठवणींचे मोहोळ माझ्या;
मि नव्याने शोधले.
ती मात्र माझ्याबरोबर;
माझिच बनून बोलत गेलि;
भरून आलेल्या आकाशाप्रमाणे;
माझ्यावर बरसून गेलि.
तिच असं मोकळ होन ;
कुठेतरी माझ्या मनाला आवडतं होतं;
तरिही ते माझ्या तिच्यातला;
एक समान धागा शोधत होतं.
त्या आठवणींचा आणि धाग्यांची गुंतावळ;
अचानक मला सांगून गेली;
अरे हि तर माझिच प्रतिमा होति;
स्वतःच अस्तित्व हरवलेलि.