साद

वळणावरुनी जुन्या त्या कोणी
घालू नका रे ती साद पुन्हा
अश्रू नको पुन्हा ते दुःखाचे 
कोरडा नको तो उसासा पुन्हा
         आठवणीतल्या मागच्या त्या
         काव्य सर्व विसरलो मी आता
         विस्तीर्ण शितीजे आज माझी
         विसरलो माघची ती सर्व गाथा
नको ते काळीज तुकड्याचे
नको काळजाचा तुकडा तो पुन्हा
नको तोच तो देव आता
नकोच तो पुन्हा आता गुन्हा
         तुटली शृंखला ती प्रेमाची
         बंधन विरहित जगतोय पुन्हा
         आरशात मनाच्या ह्या माझ्या
         ईश्ववरी रुप पाहतोय पुन्हा

अलोक जोशी