आदल्या दिवसापासूनच हुरहुर असते
तुझा फोन येईल की एसएमएस?
काटा बारावर सरकायला लागल्यावर धडधड अजून वाढते
सारखा मी फोन चेक करत राहतो, नेट्वर्क आहे ना!
काटा बारावरून पूढे सरकून जातो तुझा फोन नाही येत, एसएमएस पण नाही,
माहित असतं तू रात्री फोन नाही करणार.
हुरहुर, धडधड, आठवण, तळमळ.
टू बी कंटीन्यूड......
कसल्याश्या स्वप्नाने माझे डोळे उघडतात,
मी पहील्यांदा जाउन फोन चेक करतो, काही नसतं.
रात्रीचे तीन वाजलेत, पुन्हा झोपी जाण्याचा निष्फळ प्रयत्न....
ऑफीसला जायला निघतो, सारं लक्ष फोन वर!
एक मन सांगतं तू फोन नाही करणार, एक मन सांगतं अॅट लिस्ट एसएमएस तरी येईल.
लोकल मधून जाताना तुझी बिल्डिंग दिसते.
उगाच वेडी आशा, तु दिसशील..
आज आवडते ट्रॅक्सही ऐकावेसे वाटत नाहीत, तरीही "बेबी व्हेन यू वेअर गॉन" ऐकत राहतो.
एक दोन रेगुलर फोन / एसएमएस येतात, तरीही तुझा फोन येत नाही.
मी दुसऱ्या मनावर ठाम आहे.......
ऑफीसमध्ये शिरल्यावर सर्वजण विश करतात,
पार्टी, पिझ्झा, बकार्डी असे नेहमीचे शब्द कानावर आदळतात,
ऑर्कुट्वरच्या आणि फेसबूकवरच्या स्क्रॅप्सना रिप्लाय करून होतात,
तुझा फोन नाही......
दिवस संपायला येतो, अजूनही मी दुसऱ्या मनावरच ठाम आहे....
संध्याकाळी घरी परतताना पुन्हा लोकलमधून तुझी बिल्डिंग दीसते,
मी एनिग्माचे ट्रॅक्स ऐकतोय; ग्रॅव्हीटी ऑफ लव्ह, प्रिन्सिपल्स ऑफ लव्ह वैगेरे....
रात्र होते.....
तू विसरलीस असं नाही वाटत,
जुने दिवस आठवायला लागतात,
तू आठवत राहतेस,
बाहेर पाउस कोसळतोय. मी अजूनही दुसऱ्या मनावर ठाम आहे.....
अॅट लिस्ट दुसऱ्या दिवशी तू फोन किंवा एसएमएस करशील.
विश यू अ व्हेरी हॅप्पी बर्थ डे, दीप!
आय लव्ह यू अँड आय मिस यू सो मच!!!