वळणा-वळणावर

ही कविता फार पूर्वी 'मनोगत'वर सादर केली होती. मला ती सद्यकालसंगत वाटली म्हणून पुन्हा देत आहे.

वळणा-वळणावर विस्थापितांच्या वाताहत वस्त्या
विपर्ण वृक्षांनी वेढलेल्या.

वळणा-वळणावर वार्ता वाटमारीच्या
विखुरलेल्या विमनस्क वाटांवर.

वळणा-वळणावर वर्दी विद्रोहाची, विस्फोटाची
विषण्ण वाऱ्याने वाहिलेली.

वळणा-वळणावर विझते-विझणारे वन्ही
वीरांच्या विलापिता विधवा.

वळणा-वळणावर विनाशी वणवे
वैरागी विधात्याची 'विश्वविराणी'?

----------------------------------------------------------------------
जयन्ता५२