चेहऱ्या मागे चेहरे दडलेला
खरे-खोटे कुणास कळला?
प्रत्येकाचा रंग वेगळा
काळा, गोरा कुणी सावळा
गोऱ्यात कधी काळा लपलेला
काळ्यावरती गोरा फासलेला
सावळ्याचाही रंग वेगळा
प्रत्येक चेहऱ्याचा भाव वेगळा
भाव-भावातही लपंडाव चालला
दुसऱ्यच्या दु:खात सुख दडलेला
सुखात दुसऱ्याच्या चेहरा पडलेला
होवो प्रत्येक चेहरा समानतेचा
पारदर्शी माणूसकीचा
अन सुंदर, सज्जन निर्मळतेचा.