आतृप्ती

'ती'

दूर-दूर

ओढ

अनामिक

बेचैनी

अनवरत ।

'ती'

आता 'ही'

जवळिक

निरंतर

अतृप्ती

तरीही ।

धावणं

चौखूर

मनमृगाचं

तृषार्त

जलशोध

अथक ।

उपरती

सायंकाळी

ना 'ती'

ना 'ही'

रती

खरी ती

मुक्ती ।

प्रतीक्षा

तिचीच

आता...

मन

निरोढ

निरिच्छ

निरभ्र

सुनील

अलिप्त ।

गत...

हिचीही

तशीच !

आता...

सहप्रवास

दोघांचा

विदेही

एकात्म

सप्रेम

सात्त्विक ।

दोघंही

आतृप्त !!