हवी हवीशी !

एक नजर प्रेमाची
हवी हवीशी वाटणारी
कुठेही ति असली
तरी जवळ माझ्या भासणारी

         फुलाला गुलाबाच्या काटे
         बघणारे बघोत बिचारे
         नजर आमची रसिक
        गुलाबा जवळ असणारी

घायाळ किति त्या नजरेने
किती प्रेमवीर झाले योगी
अहो मोठे मोठे योगी
होतात की आज तिचे रोगी

नजरेचा एका खेळ सारा
पसारा नजरेचाच सारा
कोणी किती हि नाही म्हणो
पण हवी हवीशी वाटणारी