ओढ

ना रंगाचे ना रेषांचे , तालाचे ना लयीचे
आकाराचे ना विकाराचे, नाहीत कुठले पाश
वाऱ्यावरल्या पाखराचे, माझे मुक्त आकाश

भिरभिरत्या नजरेत, साठवतो नियतीचे इशारे
रात्रीच्या डोहात माझिच प्रतिमा शहारे
कंठही होतो कोरडा न निशब्द
आवाज फुटत नाही, मूठ वळते फक्त ..

चिरडत्या भावनांचे, कानी येती आक्रोश
मीच फाडू लागतो, भोवतीचा कोष
मला उडायचे, जगायचे उन्मुक्त ..
ना मरायचे गोठवून रक्त ..

उन्मुक्त उडण्याची जेव्हा ओढ लागते धरू
फडफडत्या ज्वालांतून ही उडते फुलपाखरू ..