केल्या काही भेटेना शब्द रुसलेला
स्थिर बिचारी उभी झरणी
चिमटित दोन बोटांच्या प्रतीक्षेत
कागदावरती शाई झरायला
केल्या आकार काही येइना
उभे समोर हात जोडोनी ते
हातात ते घालुनी माझ्या
फुलपाखरागत हातात येइना
फटका लहान मुलांसारखा एखादा
देईन म्हणतो ह्या झरणीचा
सवे निषप्राण तेची व्हावे
टोकावर झरणिच्या त्या
उमलायला हवे हळुवार पणे ते
रातराणिच्या कळी साऱखे
सुवास सुटावा असा चोहिकडे
रसिकानेही त्या मोहरावे