फेअरवेल फ़्रेन्ड

फेअरवेल फ़्रेन्ड
माझा रोल संपलाय.
माझ्या तुझ्या रस्त्याला
मागेच फाटा फुटलाय ..

तु दिलेल्या शब्दांची हास्याची, आसवांची, नजरेची
साठवण केलीय मनाच्या बरणीत..
कडु झाल मन.. नाहीच गेला वेळ
एखादी गोळी चघळीन त्यातली..
अडलेलं,चुकलेलं नक्की सुटेल गणित ..

नाहीतर चार गोळ्या
वाटीन एक दोघांना
निदान त्यांच गणित
तरी पक्क होईल

फेअरवेल फ़्रेन्ड, फेअरवेल ..
माझा रस्ता मला बोलावतोय
आत्ता धूसर असलेला चेहरा
बरोबर यायला खुणावतोय ..