तू लिही
लिही ना.. कविता ..
लिहिलंस की बरं वाटेल
काहीही लिही.. लिहीत सूट
लपवू नकोस ठसठसती मूठ
कुठे तरी हरवून, काही तरी सापडेल,
काय माहित तीच वाट, मनाला ही आवडेलस
शोधणार्या माणसाची कधीच नसते हार..
आता बास झाल म्हणून थांबू नको यार..
लिही रे अजून थोडं .. तुझं मरण टळेल..
आयुष्य किती सुंदर असतं, कधीतरी कळेल..