कागद..

तसा माणूस जन्माला येतो तो
कोऱ्या कागदासारखाच..
कुणी शुभ्र सफेद कांतीचा
तर कुणी डागाळलेल्या अंगाचा..

त्यानंतर सुरू होतो फक्त प्रवास

कुणी चित्रकाराच्या हाती तर कुणी ज्योतिष्याच्या
कुणी विद्यार्थ्याच्या हाती तर कुणी पत्रकाराच्या
लेखण्यांचे, टाईपरायटरचे वार झेलत पुढे पुढे जातो..
मरतो..
परत जन्माला येतो.
उद्देश हरवल्यासारखा भिरभिरतो परत..

सुदैवानं काही कागद अमर होतात..
काही पुजले जातात..
पुरावे समजून जाळलेही जातात,

काही सुदैवी ना दुर्दैवी ..
त्यातलाच मी एक कागद..
या कवीच्या हातातला