सोबत

वाट हरवलेल्या पाण्यासारखी
मी घाबरलेली
कडे कपारीतून डोन्गर दर्यातून
बेभान वहात सुटलेली
सगळ्याना कवेत घेत
आणि
तुझ माझ्याबरोबर असण
अगदीच काठावरच्या गवतासारख
सोबत असूनही साथीला नसलेल

सुप्रिया