काटे

तू लावून गेलीस त्या या दारातल्या झाडाच एक एक फूल ...

उमलताना एक एक पाकळी ...

उलगडत नेत एक एक आठवण आपल्या नात्याची ...

बराच वेळ रमतो मी ...

त्या प्रत्येक पाकळीआडच्या दवबिंदून्मधल्या अजब दुनियेत फिरत राहतो ...

पण मग येतो भानावर जेव्हा लक्षात येत हे,

की तू लावलेल्या या झाडाला काटेही आहेत !