माझं तुझ्यावर प्रेम आहे,
असं आता मला..... तिला म्हणावसं वाटत नाही
कारण ती जीन्स घालते, टि शर्ट घालते
ती बाई आहे की पुरुष हेच मला कळत नाही.
पण तरीही मी तिला म्हंटलं,
" माझं तुझ्यावर प्रेम आहे"
तिने माझ्या कानाखाली ठेवून दिली
म्हणाली, "कळलं...... प्रेम म्हणजे?"
मी तसाच वर्गात आलो.
सरांना म्हंटल "सर प्रेम म्हणजे?"
सरांनी दुसरा गाल लाल केला
म्हणाले, "कळलं..... प्रेम म्हणजे? "
मी तसाच वर्गाबाहेर आलो
घरी गेलो
पण मला कळालं,
"प्रेम म्हणजे, दोन थोबाडीत खाणं.....
आणि मुकाट्याने घरी येणं.