असावं नातं कस?
गव्हाच आणि जात्याचं
भुकेचं आणि भाकरीचं
जसे आहे अगदी तसे
कोण कोणात मिसळला
कोण कोणासाठी वाळला
भरडला कोण कोणासाठी
असं अगदी असंच!
मिसळ्याण्यात रंग नाही
वाळलेलं सरपणच नाही
भरडण्याची खंत नाही
मानव आहोत संत नाही
असाही उठेल सवाल
दृष्टी कुमकुवत होता
जिवाचे होतील हाल
समाजच होईल बकाल
होता विशाल दृष्टी
सार सामावून जाईल
वेडे म्हणोत कदाचित, पण
माझ्या तुझ्यात देव राहील.