उद्याची चिंता रोजच करतो
रोज कधीच हरत नाही
चिंतेसाठी ह्या उद्याच्या
आजच पोट भरत नाही.
आजच मरण उद्यावर
महिमा काळाचा खरा
माणूस संपतो काळासाठी
काळ काही सरत नाही
गुलाब आजचे टपोरे
उद्या सारे शिळे होतात
ताजे कितीही भासले तरी
शिरांवर कोणी धरत नाही
नावीन्याचा शोध येथे
चिंता उदयाची आहे तरी
आजच मरण उद्या जरी
रोजच मरण सरत नाही