शोध नवतनूचा

साकारणं  

कळीचं

संपृक्त

मृदुता

तजेला

हिरवाईचा ॥

उमलणं

कळीचं

सौंदर्य

मोहक

गंध

मंदसा

आवाहन

मूक ॥

पिंगा

वाऱ्याचा

स्पर्श

ओझरता

अवघ्राण

निसटतं

आंदोलन

सुमनाचं

हव्याहव्याशा

संगासाठी ॥

आक्रमण

भ्रमराचं

स्पर्श

काटेरी

गुणगुण

नकोशी

हुळहुळ

डंखाची

लूट

सर्वस्वाची ॥

कोमेजणं

मृदुतेचं

देहत्याग

सौंदर्याचा

निष्प्रभ

हिरवाई ॥

शोध

नवतनूचा ॥