मी आयटीत काम करतो

ऑफिस मधला निम्मा वेळ मेलींग मध्ये जातो

दर तासानं कॉफीब्रेक सुध्धा आवर्जून घेतो

च्याटींग करण्यात जातो उरलासुरला वेळ

प्रोजेक्ट आणि कामाचा मग बसत नाही मेळ

सर्फिंग करून थकल्यावर काम थोडे करतो

टाइमशीटमध्ये मात्र न चुकता ८ तास भरतो

अहो, मघापासून सांगतो काय,   मी ऐटीत काम करतो.

वर्षातून एखादी परदेशवारीही होते

नंतर मात्र कामाचे प्रेशर वाढत जाते

आरामदाई आयुष्याचा मग होतो सगळा खेळ

रात्र रात्र ऑफिसमध्ये थांबण्याची येते वेळ

ऐशोआरामाचा काळ अचानक सरतो

शनी/रवी सुध्धा मग ऑफिसच्या चकरा मारतो

काय करणार ना?  अहो मी आयटीत काम करतो.