रानात पसरे गंध
मातीचा ओला धुंद
उमलती कळ्या कळ्या
भ्रमर होई बेधुंद |
पानोपानी थेंब टपोरे
चमकती रेशमी किरणे
फांदीवरी हलके हलके
विसावलेले पंख |
तृणांकुरी नाजूक हिरव्या
पसरती रंग पिसारे
मनास मोही गेंद फुलांचे
विखूरती मधुगंध |
मयुराची साद येई
अंग - रंग उमलूनी
सुरेल गाती पक्षी
नदीतील उसळे पाणी |
गगनी इंद्रधनूच्या
सप्तरंगांच्या कमानी
रंगीत गंधीत धरणी
अभाळी उमटे लाली |