चित्र आणि प्रतिबिंब

        
चित्र हे जीवनाचे प्रतिबिंब ?
चित्र हे मानवाचे प्रतिबिंब ?
छे, छे मानवातील दानवाचे प्रतिबिंब

चित्र हे वेदनेचे प्रतिबिंब ?
चित्र हे वासनेचे प्रतिबिंब ?
छे, छे हे तर प्रणयाचे प्रतिबिंब

चित्र हे कल्पनेचे प्रतिबिंब ?
चित्र हे न दिसणाऱ्या देवाचे प्रतिबिंब ?
छे, छे हे तर वास्तवाचे प्रतिबिंब

प्रतिबिंब तरी कोणाचे प्रतिबिंब ?
तुझे, माझे, त्याचे, तिचे ?
की आपणा सर्वांचेच प्रतिबिंब ?

बघूनही न बघितलेले
समजूनही न उमजलेले
की अनिच्छेनेच स्वीकारलेले ?
रुक्ष, तरीही कवटाळलेले प्रतिबिंब ?