भाषाविषय कसे आहेत
इंग्रज माणसासारखे
सरळ चालतात
चौकोनात हसतात
त्रिकोणात हलतात
हे कोन कधी कधी टोचतातही
त्यातच ते करमणूकही करतात
कधी उत्तम भिडणारे काव्य लिहून
तर कधी विनोद करून
कधी मख्ख चेहेऱ्याचे लेख लिहून
श्राद्धाला बसल्याप्रमाणे गंभीर होतात
पण वर्तुळे त्यांना मानवत नाहीत
गोलाकार उड्यांनी त्यांचे प्रमाण बिघडते
गोलाला शिस्त कशी ती नसतेच
म्हणूनच भाषा इतरांप्रमाणे
मोकाट सुटत नाहीत
प्रतिभा , कल्पना त्यांच्या मुली
त्याही तशाच
स्वॅरपणाला शिस्तीत बसवू लागताच
बिच्चाऱ्या अश्लील ठरतात
मग वाचक चोरून वाचतात
पुस्तकात पुस्तक घालून ?
किंवा त्त्यांची मुखप्रुष्ठे बदलून
कधी धार्मिक तर कधी वॅज्ञानिक
प्रमाणाबाहेर मर्यादेबाहेर
हेही भाषांच्या शिस्तीत बसतात
म्हणूनच भाषा अभ्यासतांना
बरेचजण शिटतात.