मल्हारी

मल्हारी माझ्या मल्हारी, माझ्या मल्हारी

घ्यावा त्याचा येळकोट,धरुनी श्रद्धा हो उरी
नाश करी संकटांचा,देई हर्ष मनी खरोखरी
मनी भजा मल्हारी, वास्तव्य आहे जेजुरी
जेंव्हा मणीमल्ल दैत्यांचा,जगी होई संचार
देव, मुनी, प्रजा, अत्याचाराने  होई  बेजार
मल्हारी करे हो, मणीमल्ल दैत्यांचा संहार
आहे शिवाचा किती सुंदर मल्हारी अवतार
चंपाषष्टी दिवशी,होई दैत्यांचा समूळ संहार
मुक्ती देई दैत्याला, त्याच्या हो इच्छेनुसार
मुक्काम करे जेजुरी, भक्तांच्या इच्छेखातर
पावे भक्तास, असेल भाव मनांत खरोखर
षड्रात्राचा उत्सव होतो ,भव्य जगी साजरा
उत्साहात उचलती,तळी आरती महागजरा
उधळती खंडेरायाचा नावे,राऊळी हो भंडारा
मोदे घेऊ प्रसाद मल्हारीचा, सुखी  संसारा