पाऊले...
भुरकट
फाटलेली
चौअंगांनी
टोप्या
ओबडधोबड
बोटांवर
मळकट
जशी
टोपी
डोईवरती ॥
संग...
मातीचा
ओघाओघानं
वरदान
प्राप्त
आजन्म ॥
ओढ...
मनाला
पावसाची
तो
ढेपाळलेला ॥
ओढ...
मातीला
ओलाव्याची
ती
ढेकाळलेली ॥
ओढ...
दर्शनाची
पाऊलांना
ती भेगाळलेली ॥
ओढ...
भेटीची
चरणांना
ती
राजस-सुकुमार
तिष्ठावलेली
युगानुयुते ॥
अमृतसिंचन...
येडं-भाबडं
चरणकमलांवर
गवाक्षातून
कुडीच्या
ऊनावलेल्या
अश्रुंचं,
उबदार ॥
अमृतसिंचन...
उन्मीलित
कमललोचनातून
सद्गदित
डोईवर
ती
समर्पित
चरणांकमलांवर ॥
मन...
हलकंफुलकं
उचंबळलेलं
दोघांचंही ॥
संगमसाक्षीला...
वीट
जागती
संजय
जसा
युद्धाला
महाभारती ॥
पण, आतां...
गंगा
रोडावलेली
चंद्रभागा
आटलेली
माती
निरोढ...
भेगाळलेली ॥