जेंव्हा बनेल माझा प्रवाह;
जेव्हा सांगेन मी माझ्या डोळ्यातून;
जेव्हा बनेल माझा पाषाण;
सांग रोखू शकशील मला?
बनवशील तुझ्या मनासारखी कथा;
नाचवशील मला पात्रांमध्ये;
माझ्या जगण्यातून वगळून मला ;
एका गर्दीत सोडू शकशील मला?
जगेन मी चोरून जेव्हा;
माझ्याच जगण्याचे काही क्षण;
मला निःशब्द राहिलेलं बघून;
मला वाचा फोडशील का?
प्रत्येक क्षणांना साठवून मी;
देईन मी कवितेच रूप;
तेव्हा प्रयत्न करून बघ मला शोधायचा;
कारण मला अंदाजच नाही माझ्या प्रवाहाचा.