मोहर

अंगणात माझ्या, आम्र तरुवर

देई शीतल छाया, किती दूरवर
पाहिली तयाची, खूप रुपे सुंदर
भावले मजला, जेंव्हा येई मोहर
मोहर असे हा, तारुण्याचा  बहर
मदनाचा पाझरे, तो  द्रव झरझर
सुगंधित करतो, आसमंत दूरवर
भावतो मजला,असा सुंदर मोहर
तरुणी  करते, जसा  हो  शृंगार
वृक्ष  मिरवतो, तसा  हा  मोहर
आकर्षित करतो, द्विजास सुंदर
उठतो  पहाटे, ऐकून  पिकस्वर
पाहून असा, ऐटीत उभा तरुवर
साठवे मनी, त्याचे रुप मनोहर
मोहवी मनास, कसा  चित्तचोर
स्पर्श करतो मी त्यास हळुवार
लाजतो कसा, असे खाली नजर
संकोचतो आहे, जसा हा प्रियकर
मिरवतो जेंव्हा तो, अंगभर मोहर
रुप त्याचे असे, भावते मज सुंदर