तुडुंब चांदण्यात.

तुझा हातात हात अन मधाळ चांदरात,
सख्या, बोल एकांती हसून ओठावरील बात.
झुले स्वप्नांचा  झुला तुझ्याविना अंगणात,
सुनी सुनी रात जागी दाटलेल्या पापण्यात.
निजतात स्वप्ने सारी जेव्हा तुडूंब चांदण्यात,
का दोन जीव वेडे? एकमेकांत गुंततात.
गुंतले आजन्म मन माझे फक्त तुझ्यात,
कैद झाले क्षण प्रीतीचे लाजर्‍या स्पर्शात...
कशी मांडू मी प्रीत माझी फसव्या शब्दात,
घे कधीतरी तू माग सार्‍याचा शिरून काळजात.