असं का?

देशातील मोठा वर्ग आजही
सुखाचे दोन घास गिळत नाही
असं का? याचं उत्तर
आम्हाला कधीच मिळत नाही

शेतकऱ्यांच्या ऊसा-कापसाला
योग्य भाव कधी मिळत नाही
असं का? याचं उत्तर
आम्हाला कधीच मिळत नाही

देशातल्या लाखो घरात आजही
विजेचा दिवा कधी जळत नाही
असं का? याचं उत्तर
आम्हाला कधीच मिळत नाही

ह्याचा जाब विचारावा हे
आम्हाला कळतं पण वळत नाही
असं का? याचं उत्तर
आम्हाला कधीच मिळत नाही

ही उत्तरं मिळवण्यासाठी जोवर
रक्त आमचं उसळत नाही
तोवर आम्ही हेच म्हणणार..

असं का? याचं उत्तर
आम्हाला कधीच मिळत नाही