नाते

नाते म्हणजे काय, याचा घेतला कोणी शोध?

रक्त संबंध म्हणजे नाते, असे प्रत्येकास बोध
पती पत्नीचे, आई मुलाचे, अशी नाती अनेक
बिंबवती उदात्त महती, त्या नात्याची प्रत्येक
असते काहो खरेच, प्रेमळ नाते असे कुटुंबात?
जवळिक अस साधलेली, प्रत्येकाच्या स्वार्थात
दुखले खुपले, आजारी पडे जर सभासद घरात
किती जणांना येई कळवळा, त्याचा आजारात?
संपला प्रेम, जिव्हाळा नात्यातील असा घरात
स्वार्थापुरती उरली नाती, धन्यता सांगण्यात
निर्माण होतील नाती, जर असाल सहवासात
कळतील सुख दुःखे, त्यांची प्रत्येक प्रसंगात
मोह, मत्सर, स्वार्थ, मद तोडती नाते रक्ताचे
प्रेम आदर, माया, त्याग जोडते नाते मनाचे
निर्माण करावे नाते, आदर, प्रेम आपुलकीने
मानवता नाते आहे, चिरकाल खऱ्या अर्थाने