लालू प्रसादहे झारखंडाचे श्रीमधू कोडा यांना दवाखान्यात भेटतात व सांत्वन करतात तो प्रसंग म्हणतात
"लालू उवाच"
घाबरू नको तू मुळीच थोडा ।
तुला सांगतो मी मधू कोडा ।ध्रु।
जेव्हा मी केला चारा घोटाळा।
मुख्यमंर्त्र्याची होती गळ्यात माळा॥
का? उगी चरफड करीशी बाळा,
न्यायालय ना करी, त्वरी निवाडा॥ध्रु॥१।
अनेक वर्षे खटला हा चालेल।
जनता तोवर विसरून जाईल॥
मंत्रिपदी पुन्हा विराज होशील,
मागील तुझ्या ही जाईल पीडा।ध्रु।२।
भ्रष्टाचार करणे नेत्यांचे भूषण।
पुरुषार्थाचे खरे ते लक्षण
तुला सांगतो पुन्हा आवर्जून,
अशानेच राहतो पक्षावर पगडा।ध्रु।३।
आज विरुद्ध तुझ्या जे नेते।
तेच तुला मंडळात देतील खाते॥
जमवून घेतील तुझ्याशी"सारे ते",
मिटून जाईल मग सारा झगडा॥ध्रु।४।
"उठताना"
पाहून तुझी रक्कम मोठी।
लहान झाली माझी काठी॥
मनांत माझ्या नि रे ओठी,
तू तर निघाला माझ्याहून तगडा।ध्रु।५।
अनंत खोंडे.
१५डिसेंबर २००९.