असते कधी, जाते कधी, समजूनही येत नाही
अचानक जाताना निरोपाची, संधीही ती देत नाही
तिच्या केवळ असण्याने, उजळतात दिशा दाही
ती गेल्यावर उदासवाणी, काळोखी मग भरून राही
कधी कोमल दीपकळी, तर कधी भासे चंडिकाही
किती वेगळी तरी मोहक, वाटती तिची रूपे सर्वही
ती असताना चाले कसे, सुरळीत ते सर्व काही
ती गेल्यावर जीवनाची, वाताहत पाहवत नाही
जाचतो विरह जिचा, ती माझी प्रेयसी नाही
अहो ती तर 'वीज' आपली, जी तारेमधून वाहत राही