************************************
भिजे पापणी
पाणी हळवे
अतृप्त जाणीवा
...... फसलो नाही!
निळे पाखरू
विचार फसवे
अव्यक्त भावना
........ रुसलो नाही!
गळे पालवी
अस्वस्थ वणवे
विरक्त काजवा
....... हुरहुरलो नाही!
मनी शून्यता
अदृश्य दुरावे
उदास जोगिया
....... गुणगुणलो नाही!
सुने मी पण
अस्तित्व नुरावे
माझ्यात मीच
........ बुडलो नाही!
विशाल.
*****************************