अंधारच शेवटी सत्य असतो
ज्योत कळते, प्रकाश देते
वेड्या पतंगांना जाळून विझून जाते
सूर्य येतो, तोरा मिरवतो
दिवसभर लढून, थकून, निघून जातो
मग ब्रह्मांडाचा कण अन कण व्यापून,
तमरच उरतो, कारण
अंधारच शेवटी सत्य असतो
प्रकाशालाच भीती असते
स्रोत हरवण्याची, वादळात सापडण्याची
काळोखाच्या साम्राज्यात अस्तित्व हरविण्याची
प्रकाशालाच छंद असतो
असलेलं दाखवण्याचा, मृगजळ भासविण्याचा
सावलीचा पर्याय देऊन, उन्हात तापविण्याचा
ना मदतीचा, ना फसविण्याचा
काळोख कोणताच नियम पाळत नसतो, कारण
अंधारच शेवटी सत्य असतो