एका कळीस,

एक कळी फुलत आहे

पाकळी पाकळी उमलत आहे
एक एक पाकळी उमलतांना
सुगंध चौफेर उधळत आहे
कळीला जणु हवी आहे 
फुंकर हळुवार प्रेमाची
मायेची अन् ममतेची
सगळ्यांच्या कौतुकाची
सरस्वतीच्या कृपाप्रसादे
लक्ष्मीही तुजला लाभेल
अपूर्व या संगमाने
जीवन तुझे उजळेल
कला, साहीत्य , विद्येची
साथ लाभता काय उणे?
आकांक्षा पुढती तुझ्या 
गगन ते ही ठेंगणे.