इच्छा मनांत होती, पाहण्याची तो रायगड
शिव छत्रपतींचा, अजिंक्य किल्ला अवघड
मुंबई गोवा रस्त्यावर, होते गाव ते महाड
जवळी त्याच्या, ऊंच उभा दिसे तो पहाड
अधिरतेने गेलो,पाहण्यास किल्ला रायगड
प्रथम पोहोचलो आम्ही, ग्रामे नामे पाचाड
तिथे दिसले आम्हांस एक सुंदरसे कवाड
आत दिसले, जिजाऊच्या समाधीचे दगड
दर्शन घेऊन निघालो, चढण्यास रायगड
वळणे होती मार्गावर,खडतर अन अवघड
करती मार्ग सुकर, जोग करुनी दगडफोड
पोहोचलो पायथ्याशी,करून ती तंगडतोड
पायथ्याशी जमले होते,खूप ते रायगडप्रेमी
जोग कन्स्ट्रक्षनने केले, कामच फार नामी
पर्यटकांना राहण्यास, बांधले निवास ग्रामी
बांधला रोपवे,पोहोचण्यास रायगड मचाणी
अबालवृद्ध जातात, रोपवेच्या पाळण्यातून
आनंदित होती ते गड चढल्यावर मनातून
जोगानी केले काम, अत्यल्प फी आकारून
धन्यवाद देतील, जन कष्ट वाचले म्हणून
स्वागत करती गडावर, ते गाईड प्रशिक्षित
कथा सांगती रंगवून गडाच्या भग्न अवस्थेत
करभार पाहुनी शिवबाचा मन होते आचंबित
दूरदृष्टी, चातुर्य दिसे पाहता गडाचा बंदोबस्त
धान्यासाठी होती, खोल बळदे ती जमिनीत
तसेच दारुगोळ्यासाठी, कोठारे ती सुरक्षित
थंडगार पाणी होते, भरपूर दोन तलावात
राण्यांचे प्रासाद होते, सर्व सुखसोयीने युक्त
पुढे दिसल्या त्या, कचेऱ्या अनेक सचिवांच्या
होत्या जवळ जवळ, पण विविध खात्यांच्या
दालनात होती गाठीभेटी, अनेक मसलतीच्या
सचिव करती मसलती, साक्षीने शिवरायाच्या
शिवरायाचा दरबार भरत असे भव्य मंडपात
शिवराय बसती सिंहासनी, सुंदर मेघडंबरीत
शिवरायास ऐकू येई, शब्द बोललेला मंडपात
शिवराय करती न्याय, बसुनी याच दरबारात
पुढे जाताच दिसते , खूपच भव्य पटांगण
ज्यात करती कवायत, सैनिकांची फलटण
होती जवळच अनेक, बाजार दुकाने छान
समोर गड ज्यावर,बांधिले स्वराज्य तोरण
दिसले दोन मोठे बुरुज मोठे, पहाताच लांबून
टकमक व हिरकणी, नामे असती आवर्जून
कडेलोट शिक्षा होई, ती टकमक कड्यावरून
नाव पडे बुरुजाचे, हिरकणी गवळणी वरून
जवळच होते भवानी मातेचे पवित्र मंदिर
शिवरायाचे होते ते, श्रद्धास्थान अतिसुंदर
आहे पवित्र समाधी, शिवरायाची संगमरवर
नत मस्तक होती तेथे, महाराष्ट्राचा जनसागर