प्रतीक्षा

वाट पाहत होतो एका तरुतली मी सजणीची

भेटणार होती मला ती दोन वर्षानी एकदाची
गेलो असलो दोन वर्षे, शिक्षणासाठी परदेशी
प्रत्येक दिवस निगडित,तिच्या आठवणीशी
अधीर मन, बनले फुलपाखरू, उडते अंबरात
झाली असेल का तिची,अशीच स्थिती प्रेमात
स्फूर्ती असे  ती  माझी, सर्व माझ्या कामात
विसरलो  ना  मी तिला, कामाच्या  व्यापात
ओढ  तिची मज लागली, रहाते सदा मनांत
बदलली  नसेल ना  ती, मधल्या या काळात
असेल का  नेहमीची, हसरी आनंदी सजणी
नाराज झाली असेल का, वाट माझी पाहुनी 
येईल का ठरल्याप्रमाणे,वेळेवर या तरुतली
तगमग होई मनाची,असे ज्योत नयनातली