भेग पडते मने करपतात;
भावना मनातून मरतात;
रात्री स्वप्नांची दुथडी वाहताना;
तुझे डोळे अचानक दिसतात.
माझं स्वतःच हरवून न सापडणं;
हे असं कितीवेळा चालायचं;
राख झाली तरी प्रतीक्षा करणं;
एवढंच स्मशानाजवळ उरायचं.
जळून गेलो तरी आठवणी;
सावली बनून पाठलाग करतात;
हरवले माझे क्षण म्हणून;
अश्रू पुन्हा पुन्हा पाझरतात.
एखाद्या घटी किंवा पळीसारखं;
तू माझ्यापुरता आहेस असं वाटणं;
क्षितिजासारखा मुक्त आभास तुझा;
पण माझं आकाश बंद होणं.